‘कपिल शर्माचे डोके भ्रमिष्ट झाले आहे’, पहिल्या प्रेयसीचा आरोप

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या ट्विटर अकाऊंटवरून शुक्रवारी प्रसारमाध्यमं आणि प्रशासनाविरोधात अश्लिल शिवीगाळाचे ट्वीट एकामागोमाग एक पडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर कपिलने ट्वीट करत माफी मागितली असली तरी त्याची पहिली प्रेयसीने त्याच्याबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. कपिलची माजी सहकारी आणि प्रेयसी प्रिती सिमोसने कपिलच्या मानसिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.

कपिल शर्माने झाल्या प्रकरणाबाबत माफी मागितली असली तरी यामागे त्याचा हात असल्यास मला त्याच्या मानसिक स्थितीची चिंता असल्याचे सिमोस हिने म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना तिने हे वक्तव्य केले आहे. ‘गेल्या काही महिन्यांपासून कपिलची मानसिक स्थिती खूपच खराब झाली आहे. माझे या दरम्यान त्याच्यासोबत बोलणेही झाले, आम्ही एकमेकांची भेटही घेतली, परंतु कपिल एक वर्षापूर्वी होता तसा आता राहिलेला नाही. तो खूप बदलला आहे. हा एक प्रकारचा आजारही असण्याची शक्यता आहे’, असे सिमोस म्हणाली. कपिलच्या मनामध्ये आत्महत्येचेही विचार येत असावे. मी त्याच्यामध्ये खूप बदल झालेला पाहिला आहे. त्याचा चेहरा, त्याचे डोळे सर्वच बदलले आहे. याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता कपिल विषय टाळत असल्याचेही सिमोस म्हणाली.

दरम्यान, सिमोसने यामागे कपिलची प्रेयसी गिन्नी चत्रार्थचा हात असावा अशीही शक्यता व्यक्त केली आहे. कपिल बुद्धिमान व्यक्ती आहे. त्याच्या प्रेयसीने त्याचा फोन वापरला असावा आणि ते ट्वीट केले असावे. मला शाश्वती आहे की या सर्व प्रकारामागे कपिल नसावा, त्याने अशाप्रकारचे कोणतेही ट्वीट केले नसावे. त्याची प्रेयसी किंवा एखाद्या मित्राने हे काम केले असावे. गिन्नी आणि कपिल एक वर्षापासून एकत्र असून आणि तिने हे केले असेल तर मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते. कपिलची आवड पाहून मला त्रास होत आहे, असेही सिमोस म्हणाली. तसेच कपिलसोबत जो कोणी असा प्रकार करत असेल त्याने हे सर्व थांबवावे, त्याला सोडून जावे. कपिलला पुन्हा एकदा चांगल्यारित्या जगण्याची संधी द्यावी, असे आवाहन सिमोसने केले. दरम्यान, कपिलने याआधी प्रिती, तिची बहीण निती सिमोस आणि एका पत्रकाराविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या