
लिंग निदान चाचणी कायद्याने बंदी आहे. मात्र लिंग निदान चाचणीबाबत सर्रास युट्युबवर व्हिडीओ अपलोड केले जातात. मात्र आता अशा लोकांची खैर नाही. केंद्रीय स्वाथ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्या युट्युबर्सना नोटीस बजावली आहे. शिवाय ज्यांनी आपल्या चॅनलवर प्रसुतीपूर्व लिंग निदानचे व्हिडीओ अपलोड केले त्यांना ते 36 तासात हटवण्याचे आदेश दिले आहेत. जर युट्युबर्सने असे केले नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते. सरकारने आतापर्यंत 4000 व्हि़डीओज हटवले आहेत.
देशात प्री-कंसेप्शन अॅण्ड प्री-नेटल डायग्नोस्टिक टेक्निक अॅक्ट 1994 अंतर्गत लिंग निदान चाचणीवर बंदी आहे. या कलमाअंतर्गत डायग्नोस्टीक केंद्राला कडकपणे नियमांचे पालन करण्यासाठी सांगितले जाते. हा कायदा स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी केला आहे. मंत्रालयाचे सेक्रेटरी पीवी मोहनदास यांनी सागितले की, आक्षेपार्ह गोष्टींसाठी सोशल मीडियावर नजर ठेवून आहेत. जेव्हा लिंग निदान चाचणीबाबतचे व्हिडीओ समोर आले त्यावेळी अशाप्रकारच्या चॅनल्सची एक यादी तयार करण्यात आली. त्यानंतर त्या चॅनल्सना व्हिडीओ हटविण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली.
पीवी मोहनदास यांनी सांगितले की, याआधी सर्च इंजिन गुगललाही आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले होते. मोहनदास यांनी सांगितले जर कोणतीही व्यक्ती सोशल वेबस्ाईट्स किंवा सोशल मीडियावर पीसीपीएनडीटू कलमाचे उल्लंघन करत असल्याचे लक्षात येताच नोडल अधिकारी किंवा मंत्रालयाकडे [email protected] वर तक्रार करु शकतात.
काही दिवसांपूर्वी दिल्लीचे रेडिओलॉजीस्ट डॉ.अनुज अग्रवाल यांनी युट्युबवर असा व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये एम्स रुग्णालयाच्या नर्सिंग स्टाफ असल्याचा दावा केला होता. तो युट्युब चॅनल गर्भावस्था, गर्भावस्थेसाठी टिप्स आणि प्रसव पूर्व लिंग निदान चाचणीची माहिती द्यायचे. विशेष म्हणजे त्या व्हिजीओला सात लाख लोकांनी पाहिले होते.