पट्टा घट्ट बांधल्याने भडकली,महिलेची डॉक्टरला बीपी मशिनने मारहाण

1689

कळव्यात एका गरोदवर महिलेने क्षुल्लक कारणावरून डॉक्टर महिलेवर हल्ला केला आहे. रिंकी यादव असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रिंकी यादव ही 20 वर्षीय महिला आठ महिन्याची गरोदर होती. पोटात दुखायला लागल्याने रिंकीला कळव्यातील छत्रपत्री शिवाजी महाराज इस्पितळात दाखल करण्यात आले. सकाळी 6.15 मिनिटांनी डॉक्टर धनश्री केळकर यांनी रिंकी यादवचे ब्लड प्रेशर तपासण्यासाठीत तिच्या हाताला पट्टा बांधली.  पट्टा घट्ट बांधल्याने रिंकी भडकली आणि तिने डॉक्टर केळकर यांना लाथ मारली. रिंकीने डॉक्टर धनश्रींचा हात धरून पिरगळला आणि ब्लड प्रेशरचे मशीन त्यांच्या डोक्यावर मारले. या हल्ल्यात डॉक्टर धनश्री जबर जखमी झाल्या होत्या. डॉक्टर धनश्री त्यांच्या नाका तोंडातून रक्त वाहत होते. त्यांना चक्कर आली ज्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी रिंकू यादववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांवर हल्ला केल्यानंतर गरोदर असलेल्या रिंकूने आणि तिच्या कुटुंबीयांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र असं करताना बाळाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो असे इस्पितळाच्या कर्मचार्‍यांनी रिंकीला सागितले. ज्या दिवशी रिंकीने हल्ला केला त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळीच रिंकूची प्रसूती झाली. रिंकीवर गुन्हा तर दाखल झाला आहे मात्र तिला अटक करायची की नाही हे अजून ठरवले नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या