गरोदर अभिनेत्रीचे हॉट फोटोशूट, पाहा फोटो

बॉलिवूडमधील चित्रपटात झळकलेली व छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी ही गरोदर नुकतेच तिने एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगांची मोनोकॉनी आणि बिकीनी घातली असून यात ती फारच सुंदर दिसत आहे. हे या जोडप्याचे पहिले बाळ आहे.

अनिता व तिचा नवरा रोहीतने ऑक्टोबर महिन्यात एक क्यूट व्हिडीओ शेअर करत तिची गूड न्यूज शेअर केली होती. तेव्हापासून कायम अनिता तिच्या बेबी बंम्पचे फोटो शेअर करत असते. अनिताला सध्या नववा महिना सुरू असून लवकरच ती गूड न्यूज देईल.

अनिता व रोहित हे जिममध्ये भेटले होते. तिथे त्यांची ओळख झाली व कालांतराने या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी 2013 साली शाही विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली.अनिता व रोहितने गू़ड न्यूज शेअर करताना पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्यांनी आतापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवला आहे. सुरुवातीला डेटिंग नंतर लग्नासाठी प्रपोज करणं नंतर लग्न करणं व आता बाळाचे आगमन असा प्रवास या व्हिडीओत त्यांनी दाखवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या