भयंकर, हत्तिणीनंतर आता गर्भवती गायीच्या तोंडात फटाक्यांचा स्फोट, हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

2932

केरळमधील गरोदर हत्तिणीला अननसातून फटाके खायला घातल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता हिमाचल प्रदेशमध्येमध्ये असाच भयंकर प्रकार एका गाईसोबत घडला आहे. या गाईच्या जबड्याला गंभीर इजा झाली आहे. हा प्रकार हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात घडला आहे. या जखमी गायीचा एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचले का? – केरळला लाज वाटायला पाहिजे, मराठी अभिनेत्री संतापली

या गाईचा मालक गुर्दील सिंग याने त्याचे शेजारी नंदलाल यांच्यावर गाईला जाणूनबुजून इजा पोहचवल्याचा आरोप केला आहे. तसेच या घटनेपासून नंदलाल हा फरार असल्याचे गुर्दील याने सांगितले आहे. गुर्दील याने गाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ गायीच्या जबड्यातून रक्त वाहत असून तिला गंभीर जखम झाल्याचे दिसत आहे. ही घटना दहा दिवसांपूर्वीची असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

केरळमधील मल्लपुरम येथे एका गर्भवती हत्तिणीला काही नतद्रष्टांनी फटाके भरलेले अननस खायला दिले होते. हे अननस खाल्ल्यानंतर वेदनेने तडफडून त्या हत्तिणीचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. अनेक नामवंत व्यक्तींनी, कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आहे. समाजमाध्यमांद्वारेही अनेकजण त्यांचा राग व्यक्त करत आहेत आणि दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हत्तिणीच्या पोस्टमॉर्टेममध्ये कळाले की फटाक्यांचा तोंडामध्ये स्फोट झाल्याने हत्तिणीचा जबडा तुटला होता आणि तिला काहीही खाता येत नव्हतं. घाबरलेली हत्तीण वेलियार नदीत जाऊन थांबली होती. पाण्यात बुडल्याने तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी गेलं आणि ती निकामी झाली. यामुळे हत्तिणीचा मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टेममध्ये कळालं. ही हत्तीण 14 दिवस उपाशी होती. खायला मिळेल या आशेवर तिने गावात अनेकदा फेऱ्या मारल्या मात्र तिला खायला काहीही मिळालं नाही. भयंकर वंदना होत असताना आणि भूक लागलेली असतानाही या हत्तिणीने कोणालाही इजा पोहचवली नाही किंवा कोणाच्या घराचेही नुकसान केले नाही. यावरून ती हत्तीण किती चांगली होती याचा अंदाज येऊ शकतो असे वन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या