घंटा वाजवून पळून जायचा, प्रेम नेपाळीला अटक

1151

पोलिसांनी मुंबईतील का विचित्र प्रकाराचा उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. प्रेम नेपाळी असं या आरोपीचं नाव असून त्याला लोकांच्या घराची घंटा वाजवून पळून जाण्याची सवय होती. नेपाळीला अटक झाल्यानंतर त्याच्याविरोधात आणखी चार जण तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत.

नेपाळी हा कांजुरमार्ग भागातील नागरिकांना त्रास द्यायचा. ते गाढ झोपेत असताना नेपाळी त्यांच्या घराची बेल वाजवायचा आणि पळून जायचा. लोकांना त्रास द्यायला आवडत असल्याने तो हे धंदे करत होता. दारू पिऊन तर्राट झाल्यानंतरच त्याला हे सगळं सुचत होतं असंही तपासात उघड झालं आहे.

कांजुरमार्गमधल्या ओम श्री आकाशदीप सोसायटीमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या राकेश मेहता यांच्या घराची पहाटे 2 वाजता नेपाळीने बेल वाजवली होती. दुसऱ्यांदा बेल वाजवून तो पळून जात असताना इमारतीमधील इतर लोकांनी त्याला पकडला. त्याने या नागरिकांना आणि त्याला जाब विचारणाऱ्या मेहतांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. या इमारतीतील लोकांनी पोलिसांना बोलावून घेतले आणि नेपाळीला त्यांच्या हवाली केले.

नेपाळी याच्याविरोधात सप्टेंबर 2018 मध्ये देखील गुन्हा नोंदवण्यात आला होता.त्यावेळी त्याला समज देऊन सोडण्यात आलं होतं. मात्र यावेळी नेपाळीविरोधात तक्रार करणाऱ्यांनी प्रकरण लावून धरल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली. नेपाळी याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तो दारू प्यायला असल्याचं निष्पन्न झालं आहे. नेपाळी हा चेंबूरचा रहिवासी असून तो वेटरचं काम करतो.

आपली प्रतिक्रिया द्या