Tips : चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडल्या? ‘हे’ करा घरगुती उपाय

वय वाढले की, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात, मात्र काही वेळा कमी वयातही चेहऱ्यावर फाईन लाइन्स किंवा सुरकुत्या दिसू शकतात. हल्लीची तणावपूर्ण जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे ही सुरकुत्यांची समस्या निर्माण होऊ शकते. आहारात मिठाचे अतिसेवन करणे आणि तणावग्रस्त लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू लागतात. याशिवाय अपुरी झोप आणि दारू, सिगारेटच्या व्यसनामुळेही त्वचेवर परिणाम दिसतो. यावर त्रस्त होण्यापेक्षा काही घरगुती उपायांनीही सुरकुत्या कमी होऊ शकतात.

दुधाच्या सायीमध्ये मका आणि ज्वारीचे पीठ मिसळा. ही पेस्ट मान आणि चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. मका आणि ज्वारीच्या पिठामुळे डेड स्किन काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे, तर दुधाच्या सायीमुळे त्वचा मऊ व्हायला मदत होते. चेहरा सुरकुत्याविरहित तजेलदार होतो.

उडीद डाळीच्या पिठात चमचाभर दही घालून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. उडीद डाळीतील पौष्टिक तत्त्वांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हायला मदत होते.

हळदीत एँण्टीऑक्सीडंट आणि अॅँण्टीबॅक्टेरियल गुण भरपूर प्रमाणात आहेत. त्वचेच्या आरोग्याकरिताही तिचा फायदा होतो. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी बेसन पिठात 2 चिमूट हळद आणि 5-6 थेंब जैतून तेल घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

टोमॅटोची पेस्ट आणि अंड्याचा बलक एकत्र करा. यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला. ही पेस्ट चेहरा आणि मानेला व्यवस्थित लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.

आपली प्रतिक्रिया द्या