राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार गौरव सोहळा – टेबल टेनिसपटू शरथ कमलला खेलरत्न!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी राष्ट्रपती भवनात या वर्षांतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात खेळाडू आणि प्रशिक्षकांचा गौरव सोहळा रंगला. ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ या देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमल यांना सन्मानित करण्यात आले. याचबरोबर अविनाश साबळे, सागर ओवळकर (अर्जुन पुरस्कार) व दिनेश लाड (द्रोणाचार्य पुरस्कार) या मराठमोळय़ा खेळाडू व प्रशिक्षकांनाही मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण हॅटट्रिक
40 वर्षीय टेटे खेळाडू शरथ कमलने ऑगस्टमध्ये बार्ंमगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 3 सुवर्णांसह एक रौप्यपदक जिंकले होती. या स्पर्धेत हिंदुस्थान 22 सुवर्णांसह 61 पदकांची कमाई करीत पदकतालिकेत चौथ्या स्थानी राहिला होता.