शीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

75

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

15 वर्ष दिल्लीचे मुख्यमंत्री पद भुषवणार्‍या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दिक्षित यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, “शीला दिक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी राजधानीत विकासाची कामे केली त्यासाठी त्या ओळखल्या जातील.” दिक्षित यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सामील असल्याचेही त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “दिक्षित यांच्या जाण्याने आपल्याला दुःख झाले आहे. दिल्लीच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.”  आपण दिक्षित कुटुबींयासोबत असल्याचे त्यांनी म्हटले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनीही दिक्षित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहिल असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या