राष्ट्रपतींनी घेतली ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची भेट

2502

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सपत्नीक रविवारी मुंबईमध्ये ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची भेट घतली. राष्ट्रपतींनी त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आणि लता मंगेशकर यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना केली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि त्यांची पत्नी विनोदा राव, तसेच महाराष्ट्राचे शिक्षामंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

‘लता मंगेशकर आपल्या देशात आहेत हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. त्यांच्या गीतांनी आपल्या सर्वांचेच आयुष्य सुमधूर झाले आहे. त्यांचा साधेपणा आणि सौम्यता सर्वांनाच प्रभावीत करते’, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या भेटीनंतर म्हणाले.

याआधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेला सपत्नीक भेट दिली. संस्थेचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींसमवेत त्यांच्या पत्नी सविता, राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती व त्यांच्या पत्नी यांनी सूतकताईही केली.

आपली प्रतिक्रिया द्या