लतादीदींना शुभेच्छा देणे राष्ट्रपतींना भोवले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छांवर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सोशल नेटवर्कवर राष्ट्रपतींनीच ‘ट्रोल’ केले.

राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ वाढदिवसाच्या शुभेच्छा असा ट्वीट करण्यात आला. ( Birthday wishes to “Nightingale of India” Lata Mangeshkarji. May her voice continue to be the melody and soul of our nation #PresidentKovind) मात्र ‘नाईटेंगल ऑफ इंडिया’ ही उपाधी सरोजिनी नायडू यांना देण्यात आली होती. त्यामुळे राष्ट्रपतींना इतिहासाविषयी अपुरी माहिती असावी अशा स्वरुपाचे मतप्रदर्शन करत नेटकऱ्यांनी सोशल नेटवर्कवर राष्ट्रपतींनीच ‘ट्रोल’ केले.

लता मंगेशकर यांनी हिंदीत एक हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत तसेच इतर ३६ भाषांमध्येही गाणी म्हटली आहेत.