टेनिस व्हॉलिबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी आनंद खरे

टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांची, तर अध्यक्षपदी आनंद खरे यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिक येथे टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये सन 2020 ते 2024 या पुढील चार वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सीईओ म्हणून डॉ. व्यंकटेश वांगवाड काम पाहतील. अध्यक्षपदी आनंद खरे यांची, सरचिटणीसपदी डॉ. रितेश वांगवाड यांची, तर खजिनदारपदी गुजरातचे धरमवीरसिंग जडेजा यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष- जोसेफ जॉय (आंध्रप्रदेश), रवी शेखर मेघवाल (राजस्थान), नागेंद्रप्रसाद शर्मा (उत्तराखंड), सहसचिव- नागेश्वर राव (कर्नाटक), डॉ. एन. प्रियनदा (मणिपूर), संदीपकुमार सिंग (उत्तरप्रदेश), शशिकांत नायक (ओरिसा), विभागीय सचिव- एस. सांबाशिव राव (आंध्रप्रदेश), मुकेश बाथम (मध्यप्रदेश), शरदकुमार पंचारी (छत्तीसगड), कैलास कुमार बारीक (ओरिसा), हरींदरकुमार (दिल्ली) यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या