पुणे – राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्या पोलीस उपनिरीक्षकाचा सन्मान

पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक विजेते गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांचा कर्तव्य फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, अशोक देशमुख सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ पवार, ग्रंथपाल दिलीप भिकुले, मोहसीन शेख उपस्थित होते.

गायकवाड मागील 37 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी विश्रामबाग, वानवडी, फरासखाना, खडक, लष्कर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावले आहे. तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील तपास पथकात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. त्यासाठी त्यांना पोलीस महासंचालक प्रशस्तीपत्रकाने गौरविण्यात आले होते. पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना 420 हून अधिक रिवार्डस मिळाले आहे. कामगिरीची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. त्यापाश्र्वभूमीवर संघटनेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या