परिस्थितीमुळे 16 वर्षांचा सायकलपटू करत होता ढाब्यावर मजुरी; राष्ट्रपतींनी दिली अनोखी भेट

1002

दिल्लीतील 16 वर्षांचा सायकलपटू घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ढाब्यावर मजुरी आणि भांडी घासण्याचे काम करत होता. ढाब्यावर काम करून जमा झालेल्या पैशातीन नवीन सायकल घेण्याची त्याची इच्छा होती. मोहम्मद रियाज या सायकलपटूच्या परिस्थितीची माहिती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वृत्तपत्रातून मिळाली. त्यामुळे ते खूप भावूक झाले.त्यांनी या सायकलपटूला राष्ट्रपती भवनमध्ये बोलावले आणि शुक्रवारी त्याला नवीन सायकल भेट दिली. बकरी ईदच्या आदल्या दिवशी राष्ट्रपतींकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीने रियाजला आनंद झाला होता. देशातील युवकांना विविध क्रीडा प्रकारांकडे प्रोत्साहित करण्यासाठी राषट्रपतींनी रियाजला ही भेट दिली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रियाजला सायकल भेट देत पुढील वाटचालसाठी शुभेचछाही दिल्या आहेत. सायकलिंग स्पर्धेत विविध पदके मिळवण्यासाठी कठेर मेहनत घेत स्वप्ने साकार करावी, असे राष्ट्रपती कोविंद यांनी रियाजला सांगितले. रियाज दिल्लीतील आनंद विहारच्या सर्वोदय बाल विद्यालयात नववीत शिकत आहे. रियाजचे वडील पेशाने आचारी आहेत. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे वडिलांना मदत करण्यासाठी रियाजला ढाब्यावर मजुरू आणि भांडी घासण्याचे काम करावे लागत होते. या कामातून मिळालेल्या पैशांतून नवीन सायकल घेण्याची त्याची इच्छा होती. आता राष्ट्रपतींकडून त्याला सायकलची भेट मिळाली आहे.

आसाममध्ये झालेल्या ऑल स्कूल चॅम्पिअनशिप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी त्याला नेले होते. त्या स्पर्धेत रिजायने पदक पटकावले. सायकलिंगची आवड असलेल्याने विविध स्पर्धांमध्ये सहय़भागी होत पदके मिळवण्याची रियाजची इच्छा आहे. मात्र, घरातील घरखर्चाला हातभार लावण्यासाठी रियाजने कामधंदा करावा, असे घरच्यांचे म्हणणे आहे. या सायकलपटूची माहिती वृत्तपत्रात आल्यानंतर त्याची दखल घेत राष्ट्रपती कोविंद यांनी त्याला सायकलची भेट देत सायकलिंगसाठी प्रोत्साहन दिले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या