महाराष्ट्रातील 57 पोलिसांना राष्ट्रपती पदक

पोलीस दलात केलेल्या शौर्य, गुणवत्तापूर्वक उल्लेखनीय कामगिरीबद्दल आज राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील 57 पोलिसांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, एसीपी कल्पना गाडेकर, पोलीस निरीक्षक राजा बिडकर, अजय जोशी यांचा गौरव करण्यात आला आहे, तर अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, डॉ. सुखविंदर सिंग, एसीपी एन. टी. कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांना विशिष्ट सेवापदक जाहीर झाले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षक पदक, सुधारात्मक पदकांची घोषणा केली. राज्यातील चार पोलीस अधिकाऱयांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदके, 13 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.

शौर्य पदक- राजा आर. , नागनाथ पाटील, महादेव मडावी, कमलेश अका&, हेमंत कोरके मडावी, अमुल जगताप, वेल्ला कोरके आत्राम, सुधाकर मोगलीवार, बियेश्वर गेडाम, गजानन पवार, हरी बालाजी एन, गिरीश ढेकळे, नीलेश धुमणे.

विशिष्ट सेवा पदक- प्रभात कुमार (आयपीएस), सुखिंवदर ंिसंग (आयपीएस), निवृत्ती तुकाराम कदम (एसीपी, ठाणे), विलास गंगावणे (पोलीस निरीक्षक, मुंबई).

गुणवत्ता सेवापदक- रिंवद्र शिसवे, (सहआयुक्त, पुणे), प्रवीणकुमार पाटील, (उपायुक्त, नवी मुंबई), वसंत जाधव, (अधीक्षक, भंडारा), कल्पना गाडेकर (एसीपी, एटीएस), संगीता अल्पह्न्सो (उपअधीक्षक, ठाणे), दिनकर मोहिते (निरीक्षक, नवी मुंबई), मेघश्याम डांगे (निरीक्षक, नंदुरबार), ंिमलिंद देसाई (निरीक्षक संभाजीनगर), विजय डोळस (निरीक्षक, ठाणे), रिंवद्र दौंडकर, (निरीक्षक, नवी मुंबई) तानाजी सावंत (निरीक्षक, कोल्हापूर), मनीष ठाकरे (निरीक्षक, अमरावती), राजू बिडकर (निरीक्षक, मुंबई), अजय जोशी (निरीक्षक, मुंबई), प्रमोद सावंत (निरीक्षक, मुंबई), भगवान धाबडगे (निरीक्षक, नांदेड), रमेश कदम (उपनिरीक्षक, ठाणे), राजेश नगरुरकर (उपनिरीक्षक, बुलढाणा), सूर्यकांत बोलाडे (एएसआय, रेल्वे मुंबई), लीलेश्वर वऱहाडमारे (एएसआय, चंद्रपूर), भारत नाळे (एएसआय, सातारा), हेमंत राणे (एएसआय, मुंबई), रामदास गाडेकर (एएसआय, संभाजीनगर), हेमंत पाटील (एएसआय, रायगड), अशोक मंगलेकर (एएसआय, अमरावती शहर), जीवन जाधव (एएसआय, मुंबई), राजेंद्र मांडे (एएसआय, रायगड), विजय बोरीकर (एएसआय, चंद्रपूर), पुरुषोत्तम बरड (एएसआय, अमरावती), उदयकुमार पंलाडे (एएसआय, ठाणे), थॉमस डिसोजा (एएसआय, ठाणे), प्रकाश चौगुले (एएसआय, रेल्वे मुंबई), सुरेश मोरे (एएसआय, ठाणे), संजय साटम (एएसआय, सिंधुदुर्ग), शाकिर जिनेदी (एएसआय, पिंपरी-चिंचवड), संजय पवार (एएसआय, नवी मुंबई), शरदप्रसाद मिश्रा (एएसआय, नागपूर), प्रकाश अंडील (एएसआय, एसआरपीएफ जालना), जयराम धनवाई (गुप्तचर अधिकारी, संभाजीनगर), राजू उसेंडी (गुप्तचर अधिकारी, गडचिरोली).

तीन तुरुंग कर्मचाऱयांना सुधारात्मक सेवा पदक

देशातील 12 तुरुंग अधिकाऱयांची ‘राष्ट्रपती सुधारात्मक सेवा पदका’साठी तर 39 तुरुंग अधिकारी – कर्मचाऱयांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील हवालदार उत्तम गावडे, संतोष मंचेकर आणि बबन खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘सुधारात्मक सेवा पदक’ जाहीर झाले.

तिघांना ‘जीवनरक्षा पदक

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱया देशातील 59 व्यक्तींना सोमवारी ‘जीवनरक्षा पदक पुरस्कार’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. परमेश्वर नागरगोजे यांना ‘उत्तम जीवनरक्षा पदक’ तर ‘जीवनरक्षा पदक’ पुरस्कार अनिल खुले आणि बाळासाहेब नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या