अल्पवयीन मुलीला लग्नासाठी दबाव, गुन्हा दाखल

84

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मुकुंदवाडी परिसरातील अल्पवयीन मुलगी ही बुधवारी सकाळी किराणा सामान घेण्यासाठी जात असताना परिसरातील कपिल गडवे याने तिला अडवून तू माझ्याशी लग्न कर, मी तुझे शिक्षण पूर्ण करून तुला सरकारी नोकरी लावून देईल, असे सांगितले. मुलीने नकार देताच कपिल याने लग्न न केल्यास जीवन जगणे कठीण करीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या