पामतेल देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 21 लाखांची फसवणूक, हरियाणातील एकावर गुन्हा दाखल

हरियाणाचा एकजण साताऱ्याच्या व्यापाऱ्याला 20 लाखांचे तेल लावून पसार झाल्याचा प्रकार घडला. त्याने पामतेलाचे 2200 डबे देण्याचे आमिष दाखवून प्रतापगंज पेठेतील भारत ट्रेडिंग कंपनी किराणा दुकान व्यावसायिकाची तब्बल 20 लाख 72 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भरत अरोरा असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शिवानंद कसंत बारकडे (कय 36, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

भरत अरोरा हा हरियाणा राज्यातील अंबाला येथील प्रिशा जे. एम. डी. या कंपनीचा अधिकारी आहे. या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुहास मधुकर नकरकर यांनी शिवानंद यांची ओळख अरोरा यांच्याशी करून दिली होती. नकरकर यांनी प्रिशा कंपनीचे सूर्यकांती पामतेल विकाके, असे सांगून शिवानंद यांचा विश्वास संपादन केला. या दोघांमध्ये सुरुवातीला 1100 तेल डबे खरेदीचा व्यवहार झाला.

दुसऱ्यांदा शिवानंद यांना 2200 तेल डब्यांचे पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार शिवानंद यांनी कंपनीच्या नाके 20 लाख 72 हजार 400 रुपये भरले. पैसे भरल्यानंतर तेलाच्या डब्याची डिलिक्हरी होणे अपेक्षित होते. मात्र, शिवानंद यांना तेलाचे डबेच मिळाले नाहीत. याबाबत त्यांनी नकरकर व अरोरा यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही तेलाचे डबे मिळाले नाहीत, त्यामुळे शिवानंद यांनी फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल केला.