कराडमध्ये डेंग्यूविरोधात ‘फाईट द बाईट’मोहीम; आरोग्य विभाग सतर्क

379

डेंग्यूला हद्दपार करण्यासाठी कराड नगरपालिकेने यंदा ‘फाईट द बाईट’ मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. नागरिकांच्या सहभागाने डेंग्यूबाबत जागरूकता मोहिम घेतली जाणार आहे. त्यासाठी पालिका फ्लेक्स, एलसीडी स्क्रीनचाही आधार घेणार आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कल्पनेतून ‘फाईट द बाईट’ अभियान राबविले जात असून यंदा डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागा सतर्क झाला आहे.

डेंग्यू निर्मुलनासाठी पालिकेने कंबर कसली असून कोरोनासोबतच डेंग्यूचेही नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. मागील वर्षी शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रूग्ण होते. त्यात दोन लहान मुलांचेही निधन झाले होते. मात्र, पालिकेने केलेल्या सर्व्हेनुसार शहरात जुलैपासून डेंग्यूचे रूग्ण वाढत आहेत. त्यावेळी नोव्हेंबरअखेर डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे त्यावर प्रभावी उपाययोजना राबविल्या होत्या. जुलै, ऑगस्टपासून ऑक्टोबरपर्यंत शहरात डेंग्यूचे रूग्ण वाढले होते. ती स्थिती लक्षात घेवून यंदा पालिकेने ‘फाईट द बाईट’ अभियान हाती घेतले आहे.जिल्ह्यात डेंग्यू विरोधातील पहिलेच असे अभियान आहे. पालिकेने त्यात पुढाकार उपाययोजना राबवण्याचा निर्धार केला आहे. मुख्याधिकारी डांगे यांनी ती कल्पना मांडली आहे. त्यानुसार पालिका त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना राबविणार आहे. शहरात फ्लेक्स लावणे, त्यातून जागरूकता करणे, नागरीकांचा सहभाग वाढवणे, त्यांच्या बैठका घेणे, शहरात सर्वेसाठी पथक नेमणे अशा विविध उपक्रमाव्दारे डेंग्यूची जनजागृती होणार आहे.

शहरात डेंग्यूची माहिती असणारी पत्रके वाटण्यात आली आहेत. डेंग्यू कसा होतो याची सविस्तर माहिती त्यात दिली आहे. शहरात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन बसवून डेंग्यूची माहिती दिली जाणार आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव कसा होता त्याचाही सर्व्हे होणार आहे. फॉगिंगची फवारणीचा उपाय हाती होणार आहे. डास व किटक प्रतिबंधक फवारणीसाठीही पथक तयार केले आहे. डेंग्यूबाबत पालिका जागृती होण्यासाठी नागरीकांच्या बैठका घेत त्याची माहिती देत आहे. नागरीकांचा सहभाग वाढवून डेंग्यू निर्मुलन केले जाणार आहे. त्यासाठी पालिका आरोग्य विभाग व शासकीय आरोग्य विभाग एकत्रीत काम करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या