हत्येनंतर पुजाऱ्याची अर्धी मिशी आणि जीभ कापून नेली, भयंकर हत्येमुळे उत्तर प्रदेश हादरले

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एका मंदिराच्या पुजाऱ्याची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मारेकऱ्यांनी या पुजाऱ्याची अर्धी मिशी आणि जीभ कापून नेली आहे. पुजाऱ्याच्या खुनामागे गावातलं राजकारण कारणीभूत असावं असा पोलिसांना संशय आहे. पुजाऱ्याची नातसून ही गावची सरपंच आहे. ती सरपंच होणं न आवडलेल्या लोकांनी ही हत्या केली असावी असा संशय वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी अज्ञांत व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.

अढौली गावातील एका मंदिराचे पुजारी असलेले महंत खेमकरण हे जेवण झाल्यानंतर रोजच्याप्रमाणे मंदिरात झोपण्यासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास मंदिरात घुसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांचा गळा चिरून हत्या केली आणि नंतर त्यांची अर्धी मिशी आणि जीभ कापून पळून गेले. खेमकरण यांची नात एका कार्यक्रमातून घरी परतत असताना तिने मंदिरात जाऊन मग घरी जावं असं ठरवलं होतं. ती मंदिरात पोहोचली तेव्हा खेमकरण यांचा मृत्यू झालेला होता. तिने हा प्रकार तिच्या भावाला म्हणजेच पोप सिंह याला सांगितला. त्याने घटनास्थळी धाव घेत पोलिसांनाही या प्रकाराबाबत कळवलं.

आपली प्रतिक्रिया द्या