श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा राजपक्षेंनी मागितला राजीनामा

483

आपला धाकटा भाऊ गोटबाया राजपक्षे राष्ट्रपती बनल्यानंतर श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशाचा राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ एकाच पक्षाचे असेल तर शासन चालविणे सुकर होईल असे सांगत राजपक्षेंनी हा राजीनामा मागितला आहे. 74 वर्षीय राजपक्षे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका सोहळ्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ एकाच पक्षाचे असणे कोणत्याही सरकारसाठी चांगले असते. आता लवकरच सर्वसाधारण निवडणुका होतील तर जास्त बरे होईल. कारण मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मतदानाद्वारे आता जनतेलाच हा फैसला करू दे, असेही महिंद्रा राजपक्षे यांनी स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या