आधी टकल्यावर हात फिरवला, मग पाठ थोपटली; मोदींचा व्हिडीओ व्हायरल

1682

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कठोर निर्णयासह मजेशीर अंदाजासाठीही ओळखले जातात. भूतान दौऱ्यावर असताना त्यांचा हा खास अंदाज तेथील लोकांनीही अनुभवला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दोऱ्यावर गेले होते. या ठिकाणी त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. मोदींनी भूतानच्या खासदारांसोबत बैठक घेत त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर मोदी थिंपू येथील रॉयल भूतान विद्यापीठात गेले. या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी फोटोसेशनसाठी आलेल्या खासदाराच्या टकल्यावरून मोदींनी हात फिरवला तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर मोदींनी त्यांची पाठही थोपटली.

आपली प्रतिक्रिया द्या