न्यायव्यवस्थेच्या कारभारावर शिंतोडे आणि मोदी सरकारची धावपळ

41

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयातील कारभारावर ४ न्यायमूर्तींनीच आक्षेप घेऊन पत्रकार परिषद घेतल्याने केंद्रातील मोदी सरकारची प्रतिमा मलिन झाली. देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना मोदी सरकारच्या काळात घडल्याने मंत्रिमंडळही चिंतेत असून प्रतिमा जपण्यासाठी पळापळा सुरू झाली. अन्य कार्यक्रम पुढे ढकलून मोदींनी या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी विधी मंत्री रविशंकर आणि विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांना तातडीने बोलावले आहे, अशी माहिती मिळते. वृत्तसंस्थांनीही या संदर्भातील माहिती सूत्रांच्या आधारे दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी बातचित केली आणि तात्काळ बैठक बोलवली. तर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी अॅटॉर्नी जनरल केके वेणूगोपाल यांची भेट घेतली आणि ४ न्यायमूर्तींनी केलेल्या आरोपांसंदर्भात चर्चाही केली. तसेच ते पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार असल्याची माहिती मिळते.

आपली प्रतिक्रिया द्या