मोदींसाठी नवी कोरी दोन विमाने,‘एअर फोर्स वन’च्या धर्तीवर विमानांची बांधणी

318

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवाई प्रवासासाठी नवी कोरी दोन विमाने बनविण्यात येणार आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ‘एअर फोर्स वन’च्या धर्तीवर या विमानांची निर्मिती होणार आहे. एअर इंडियाऐवजी इंडियन एअर फोर्सकडे निर्मितीची जबाबदारी देण्यात आली आहे. मिसाईल हल्ला परतवून लावण्याची क्षमता यामध्ये असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला परतुरमध्ये

साऊथ ब्लॉकच्या हवाल्याने एका इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून विदेश दौऱ्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचा वापर केला जातो. दौरा छोटा असेल तर हवाईदलाच्या व्हीव्हीआयपी ताफ्यातील विमानांचा वापर होतो.

दिवाळीत पराक्रमी मुलींचा सन्मान करा, तेच लक्ष्मीपूजन – पंतप्रधान मोदी

‘बोईंग 777’ची बांधणी सुरू

  • बोईंगच्या डलास येथील प्रकल्प स्थळावर बोईंग-777 या विमानांची बांधणी सुरू आहे.
  • पुढील वर्षी जून 2020 पर्यंत ही विमाने हिंदुस्थानात लँडिंग करतील.
  • पंतप्रधानांसाठी बनविण्यात येत असलेली ही दोन्ही विमाने मिसाइल डिफेन्स सिस्टम सुसज्ज असतील.
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे बोईंग 747 इतकेच हे सुरक्षित असेल.
  • शत्रूने डागलेल्या क्षेपणास्त्रापासून संरक्षण करणारी, क्षेपणास्त्राचा मार्ग बदलण्याची क्षमता म्हणजे मिसाइल डिफेन्स सिस्टम.
  • अमेरिका, रशिया, चीन, इस्राएल, तैवान आणि हिंदुस्थानने अशी सिस्टम विकसित केली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या