प्रिन्स नरूला-युविका चौधरी ‘शबाना’मध्ये

प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी यांच्या भूमिका असलेल्या ‘शबाना’ या वेबसीरिजच्या पहिल्या टीजर पोस्टरचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे. या पोस्टरवर प्रिन्स आणि युविका यांची झलक पाहायला मिळतेय. उल्लू डिजिटलचे सीईओ विभू अग्रवाल म्हणाले, ‘शबाना या सीरिजवर आमची टीम अतिशय मेहनत घेत आहे. प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी यांना या सीरीजमध्ये घेण्याचा निर्णय जाणूनबुजून घेण्यात आला होता. कारण ते दोघेही तरुण आणि आधुनिक व्यक्तिमत्त्वाचे आहेत. अनिल जॉर्ज आणि राहुल देव हे कलाकारदेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतील.

निखिल खेरा निर्मित आणि अभिजित दास दिग्दर्शित ‘शबाना’चा प्रीमिअर लवकरच होणार आहे. याबाबत प्रिन्स आणि युविका म्हणाले, सुरुवातीला टॅलेंट कंपनीने आमच्यासोबत या प्रोजेक्टसाठी संपर्क साधला तेव्हा आमच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आम्ही प्रोजेक्ट नाकारला होता. पण कथानक आवडल्यामुळे इतर प्रोजेक्ट्स सोडण्याचा निर्णय घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या