वारी मार्गावर वारकऱ्यांना मिळणार आरोग्य सुविधा, प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सोलापूरात घेतला आढावा

यावर्षी होणाऱ्या आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना आरोग्यसुविधा मिळणार आहेत. तसेच ‘निर्मल वारी, हरित वारी’ व्हावी, यासाठी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी गुरुवारी (दि.1) शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाची बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी
उपस्थित होते.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वारकऱ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे, महिलांना बसचे अर्धे तिकीट असल्याने यावेळी महिला वारकरी अधिक येण्याची शक्यता आहे. महिलांच्या तपासणीसाठी महिला वैद्यकीय अधिकारी देण्यात यावी. वारी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरवर उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये वीस बेडचा ट्रॉमा सेंटर लवकर चालू करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कळसंग येथील ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ‘एक कुटुंब एक वृक्ष’ या अभियानांतर्गत पालखीमार्गावर वृक्ष लागवड व संवर्धनाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. गतवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने ‘हरित वारी’ ही संकल्पना राबविली होती. तीच संकल्पना क्यापक प्रमाणात यावर्षी या अभियानात राबवून पालखीमार्गावर असलेल्या ग्रामपंचायतींनी गाव परिसराबरोबरच पालखीमार्गावर प्राधान्याने कृक्षलागवडीचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक कुटुंबाला वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी देण्यात यावी, असे सांगितले. येत्या पाच-सहा वर्षांत पालखीमार्ग हरित होऊन कारकऱ्यांना सावली उपलब्ध होईल.

या बैठकीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता ड़ॉ सुधीर देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, डॉ. अनिरुद्ध पिंपळे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेक दुधभाते, डॉ. श्रीकांत कुलकर्णी व जिह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आषाढी वारीच्या काळात म्हणजे दि. 20 जून ते दि. 4 जुलै या दरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीला राहण्यास जागा देऊ नये. जिह्यामध्ये जी व्यक्ती नव्याने राहण्यास येईल, त्या व्यक्तीला व जे कोणी राहण्यास जागा उपलब्ध करून देणार आहेत, असे घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मशीद, चर्च, धर्मशाळा इत्यादींचे विश्वस्त यांनी त्या व्यक्तींच्या संदर्भातील माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे गरजेचे असल्याचे त्यामध्ये नमूद केले आहे.
शमा पवार, अपर जिल्हादंडाधिकारी, सोलापूर

पंढरपूर शहरात घाण केल्यास कारवाई

पंढरपूर आषाढीवारी यात्रा कालावधीत पंढरपूर शहर व गावात सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास कारवाई होणार आहे. याबाबतची नोटीस अपर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी काढली आहे. दि.20 जून 2023 ते दि.4 जुलै 2023 या कालावधीत पंढरपूर शहरात लघवीस, शौचास बसण्याकरिता शासनाने उपलब्ध करून दिलेले कायमस्करूपी अथवा तात्पुरते शौचालय यांचा वापर करावा. या व्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.