येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

28

सामना प्रतिनिधी । पुणे

बाथरूमला जाताना झालेल्या वादातून येरवडा कारागृहात कैद्यांची हाणामारी झाली. काल दुपारी घडलेल्या या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कारागृहरक्षक हरिश्चंद्र राऊत यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार सात कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल दुपारी दत्ता माने याची अरबाज शेख याच्याशी वादावादी झाली. त्यानंतर दत्ता माने आणि त्याच्या सहा साथीदारांनी शेख याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये शेख जखमी झाला.

आपली प्रतिक्रिया द्या