कोरोनात पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांना तत्काळ हजर व्हावे लागणार

कोरोना महामारीच्या काळात पॅरोलवर सुटलेल्या कैद्यांना  पंधरा दिवसांत तुरुंगात हजर रहावे लागणार आहे. त्याबाबतचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दोन वर्षांपूर्वी तुरुंगातील कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी न्यायालयाने विविध गुह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आणि न्यायालयात खटला सुरू असलेल्या अनेक पैद्यांना आपत्कालीन पॅरोल मंजूर केला होता. दरम्यान, कोरोना माहामारीचा संसर्ग संपलेला असतानाही अनेक कैदी तुरुंगात परतलेले नाहीत. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने संबंधित पैद्यांना पंधरा दिवसांत हजर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून पॅरोलवर मुक्तपणे बाहेर फिरणाऱया कैद्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.