‘अंडर-१९ वर्ल्डकप’साठी संघ जाहीर, मुंबईकर पृथ्वी शॉ कर्णधार

35

सामना ऑनलाईन । मुंबई

आयसीसीच्या ‘अंडर-१९ वर्ल्डकप’साठी हिंदुस्थानच्या संघाची घोषणा करण्यात आली असून मुंबईकर पृथ्वी शॉकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. पुढील वर्षी १३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान न्यूझीलंडमध्ये ‘अंडर-१९ वर्ल्डकप’ होणार आहेत.

रविवारी ३ डिसेंबरला ऑल इंडिया ज्यूनियर संघाच्या निवड समितीने स्पर्धेसाठी १६ खेळाडूंच्या संघ जाहीर केला. दिलीप ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणातच शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा मान पटकावणाऱ्या पृथ्वी शॉला कर्णधार करण्यात आले आहे. पृथ्वीने रणजी ट्रॉफी आणि दिलिप ट्रॉफीमध्ये शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

विश्वचषकाच्या तयारीसाठी ८ ते २२ डिसेंबर दरम्यान बंगळूरूमध्ये सराव शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र पृथ्वी शॉ या शिबीरात सुरुवातीचे काही दिवस भाग घेणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सराव शिबीरा दरम्यानच मुंबईचा रणजी ट्रॉफीतील सामना असल्याने पृथ्वी या सामन्यात प्रतिनिधित्व करणार आहे. त्यानंतर १२ डिसेंबरला तो या शिबीरात सहभागी होईल.

२०१६मध्ये उपविजेतेपद
हिंदुस्थानने आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत प्रत्येकी तीन वेळा ‘अंडर-१९ वर्ल्डकप’ जिंकला आहे. याआधी २०१६मध्ये बांग्लादेशात आयोजित ‘अंडर-१९ वर्ल्डकप’ स्पर्धेत हिंदुस्थानला अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हिंदुस्थानी संघ
पृथ्वी शॉ (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), मंजोत कालरा, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जुआल (यष्टीरक्षक), हार्विक देसाई (पर्यायी यष्टीरक्षक), शिवम मावी, कमलेश नागरकोटी, ईशान पोरेल, अरशनदीप सिंह, अनुकुल रॉय, शिवा सिंह आणि पंकज यादव.

आपली प्रतिक्रिया द्या