50 वर्षांचा गुड्डू ‘प्रिती’त गुंतला, 14 लाख रुपयांचा चुना लावून महिला गायब

3472

नागपूरमध्ये 50 वर्षांच्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका महिलेने त्याला 14 लाखांपेक्षा अधिक रकमेचा चुना लावला आहे. प्रिती ज्योतिर्मय दास असे या महिलेचे नाव असून तिचा अद्यापही शोध लागू शकलेला नाहीये. उमेश उर्फ गुड्डू असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रितीने सुरुवातीला गोड,गोड बोलून गुड्डूकडून पैसे उकळले. पैसे परत मागितल्यानंतर तिने गुड्डूला धमकवायला सुरुवात केली. या धमक्यांना घाबरून गुड्डू तिला पैसे देत गेला आणि त्याला 14 लाख 87 हजार 600 रुपयांचा चुना लागला.

प्रितीने फेसबुकवरून गुड्डूशी संपर्क साधला होता. तिने गुड्डूला सांगितलं की बायकोला घटस्फोट दिल्यानंतर आपण दोघे एकत्र राहू असं आश्वासन दिलं होतं. गुड्डू प्रेमात आकंठ बुडाल्याचं कळाल्यानंतर प्रितीने त्याला फ्लॅट घेऊन देण्याचं आश्वासन देत 2 लाख 60 हजार रुपये उकळले. मात्र त्या पैशांचे प्रितीने घर विकत घेतलेच नाही. ही बाब गुड्डूला कळाल्यानंतर त्याने तिला जाब विचारला. यावर प्रितीने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी द्यायला सुरुवात केली.

प्रिती ही अट्टल भामटी असून तिच्याविरोधात पोलिसांत यापूर्वीच 2 गुन्हे दाखल आहेत. श्रीमंत व्यक्तींशी ओळख वाढवून , त्यांना आमिषे दाखवायची आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचे ही तिची गुन्हा करण्याची पद्धती आहे. याशिवाय आपल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत हे सांगून नोकरी लावण्यासाठी पैसे उकळत तिने काही बेरोजगार तरुणांनाही फसवलं आहे. प्रितीविरोधातील तिसरा गुन्हा हा 4 जून रोजी नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या