खासगी कंपनीने जपली माणुसकी, शिरोळकरांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप

386

महापुरात शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड गाव आपलं सर्वस्व गमावून बसले आहे. अनेकांची घर-संसार या महापुरात वाहून गेले. गाव पाण्याखाली गेल्याने शेकडो घरे पडली आहेत तर मुके जनावरे वाहून गेली. त्यामुळे पूरग्रस्तांना सावरण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पुणे चाकण येथील अ‍ॅडविक हाय-टेक प्रा. लिमिटेड कंपनीच्या वतीने गावातील पूरग्रस्त कुटूंबाना संसारोपयोगी साहित्य, भांडी, शाळकरी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिरोळ तालुक्याला महापुराच्या पाण्याने वेढा दिला आणि बघता बघता या महापुराने अनेक गावे गिळंकृत केले. महापुराचे पाणी आता ओसरू लागले आहे. पाणी ओसरल्यानंतर तिथे अजूनच भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. ही भीषणता लक्षात घेऊन राज्यभरातील लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरिता आपल्या मदतीचा हातभार लागावा म्हणून पुणे चाकण येथील अ‍ॅडविक हाय-टेक प्रा. लिमिटेड कंपनी पुढे आली या कंपनीच्या वतीने आणि कुरुंदवाड येथील जवळपास चारशे कुटुंबाना मदतीचा हात दिला.

काही माणस सदैव समाजाला वाहून घेणारी असतात त्यानुसार पुणे चाकण येथील अ‍ॅडविक हाय-टेक प्रा. लिमिटेड, कंपनीचे विशाल भांगे, राकेश जोगी मिलिंद बोरसे, तुषार हांडे, राकेश खैरनार, अनिकेत शेनकर, आकाश अडे यांच्या टीमने गेली कित्येक वर्ष हा वारसा त्यांनी जपला आहे. दुर्गसंवधन, स्वच्छता मोहीम, दुष्काळ निवारण, वृक्षा रोपण, आश्रम शाळांना मदत, आदिवासी विकास अशा अनेक कार्याद्वारे समाजभिमुख काम केलं. याच सामाजिक बांधिलकीतून कधीही न पाहिलेल गाव, अनोळखो नागरिक, कोणतंही नातं नसताना केवळ माणुसकी जपत आणि मित्र प्रशांत पाटील च्या गाव आणि परिसरातील औरवाड, कवठेगुलंद, हेरवाड आदी गावातही झालेले नुकसान पाहून या कंपनीने कुरुंदवाड गावात जाऊन अनेक कुटुंबाना मदत करून आधार दिला. त्यांनी दिलेला आधार पाहून अनेक महिलांना अश्रू अनावर झाले.

आपली प्रतिक्रिया द्या