‘नये गायकवाडको साम्राज्य संभालने दो,’ सिटी ऑफ ड्रीम्सचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पौर्णिमाने आपल्या भावाचा काटा काढून मुख्यमंत्रिपदी आरूढ झाली आहे. पण तिचे वडील अमेय राव यांना पसंत नाहिये म्हणून आता कन्या विरोधी पिता अमेय राव यांच्यात संघर्ष सुरू होणार आहे. नुकतंच सिटी ऑफ ड्रीम्सच्या दुसऱ्य़ा सीजनचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रिया बापट पौर्णिमा तर अतुल कुलकर्णी अमेय रावच्या भुमिकेत असणार आहेत. नव्या सीजनमध्ये पिता विरूद्ध कन्या दरम्यान सत्तेसाठी संघर्ष सुरू होणार आहे. हा संघर्ष अधिक हिंसक आणि बेदरकार असणार आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता 30 जुलै रोजी या वेबसीरीजचा दुसरा सीजन हॉटस्टारच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या