अमेरिकेत उद्रेक; प्रियांका आणि निकनेही केलं ट्वीट, व्यक्त केला संताप

जॉर्ज फ्लॉयडच्या निधनानंतर अमेरिकेत निदर्शने सुरू आहेत. आता या आंदोलनाला सेलिब्रिटींचेही समर्थन मिळत आहे. अलीकडेच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोन्स यांनीही वर्णद्वेषाविरोधात आवाज उठविला असून जॉर्ज फ्लॉयडला न्याय मिळावी अशी मागणी केली आहे.

निक जोन्स याने ट्विट केले आहे, ज्यात तो म्हणतो की, माझे आणि प्रियांकाचे हृदय भरून आले आहे. या देशात आणि जगात असमानतेचे (वर्णभेदाचे) सत्य स्पष्ट दिसते आहे. प्रियंका चोप्रानेही आपल्या ट्विटर हँडलवरून निकचे हे ट्विट शेअर केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये वंशवादाविरूद्ध आवाज उठवताना निक जोन्स लिहितो की, “माझे आणि प्रियांका चोप्रा यांचे हृदय भरून आले आहे. या देशात आणि जगभरातील असमानतेचे सत्य दिसते आहे. वर्णद्वेष, धर्मांधता आणि बहिष्कार बऱ्याच काळापासून सुरू आहे आणि अशा वेळी शांत राहणे हे केवळ त्यास बळकट करते, परंतु ते पुढेही चालू ठेवण्यास देखील अनुमती देते. “

निक जोन्सने अनेक ट्वीट देखील केले ज्यात त्यांनी लिहिले की, “कारवाई करण्याची हीच वेळ आहे. फक्त ‘मी वर्णद्वेषी नाही’ असे म्हणणे पुरेसे नाही. आपण सर्वांनी वंशविद्वेद्विरोधी आणि कृष्णवर्णीय समुदायासोबत उभे राहिले पाहिजे.”

एवढं बोलून निक थांबला नाही, त्याने जॉर्ज फ्लॉयडला न्याय मिळवून देण्यासाठी आणखी एक ट्विट केले. त्याने लिहिले, “आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो. कृष्णवर्णीय लोकांचे आयुष्य महत्त्वाचे आहे. जॉर्ज फ्लॉयडसाठी न्याय आवश्यक आहे.”

जॉर्ज फ्लॉयडशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने जॉर्जच्या मानेला गुडघ्याने दाबले होते. यामुळे जॉर्ज मरण पावला, ज्यामुळे लोकांनी वर्णद्वेषाविरूद्ध आवाज उठवायला सुरुवात केली.

आपली प्रतिक्रिया द्या