प्रियंका चोप्राला दुसऱ्यांदा मिळाला ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार

सामना ऑनलाईन । लॉस एंजलिस

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला तिची हॉलिवूड मालिका ‘क्वॉटिंको’साठी ‘पीपल्स चॉईस’ पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेतील तिची ‘अॅलेक्स पॅरिश’ची भूमिका प्रचंड गाजत असून तिच्या अभिनयाचे जगभरातून कौतुक होत आहे.

प्रियंकाला सलग दुसऱ्या वर्षी पीपल्स चॉईस पुरस्कारांमध्ये ‘फेव्हरेट ड्रमॅटिक ऍक्ट्रेस’चा पुरस्कार मिळाला आहे. ‘सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाल्याने मी खूप खुष आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्यावर व माझ्या कामावर विश्वास दाखविल्याबद्दल मी सर्व चाहत्यांचे आणि माझ्या क्वांटिको टिमचे आभार मानते.’ अशा शब्दात प्रियंकाने पुरस्कार स्विकारल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या. या पुरस्कार सोहळ्याला प्रियंकासोबत तिची आई मधू चोप्रा पण उपस्थित होती.
या पुरस्कार सोहळ्यात प्रियंकासोबत लिली सिंग या आणखी एका हिंदुस्थानी वंशाच्या यू टय़ुब स्टारला पिपल्स चॉईस पुरस्कार मिळाला आहे. लिलीला ‘फेव्हरेट युटय़ुब स्टार’ या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला.