प्रियांकाचे सिक्स पॅक अॅब्स

91

सामना ऑनलाईन, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने हॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. लवकरच इजंट इट रोमँटिक या हॉलीवूडपटात ती सिक्स पॅक अॅब्समध्ये दिसणार आहे. टॉड स्ट्रॉस यांनी इजंट इट रोमँटिकचे दिग्दर्शन केले आहे. त्यामध्ये प्रियांका योगगुरुची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. भूमिकेच्या गरजेनुसार प्रियांकाची मेहनत घेण्याची तयारी असते. मेरी कोम या हिंदी चित्रपटासाठीही तिने कसून मेहनत घेतली होती. सध्या तरी प्रियांकाच्या सिक्स पॅक अॅब्सची चर्चा इंडस्ट्रीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या