चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, विचित्र ड्रेसमुळे प्रियांका झाली ट्रोल

प्रियांका चोप्रा ही कायम तिच्या फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते. मात्र कधी कधी तिचा हा फॅशन सेन्स तिच्यावरच उलटतो व ती ट्रोल होते. असाच प्रकार आताही घडला आहे. प्रियांकाने चक्क एका मोठ्या भोपळ्यासारखा ड्रेस परिधान केला आहे. तिचा हा ड्रेस पाहून लोकांना भोपळ्यात बसलेली म्हातारीची गोष्टच आठवली आहे. त्यामुळे लोकांनी तिला ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ म्हणत ट्रोल केले आहे.

प्रियांकाने हालफर्न स्टुडीयोने डिझाईन केलेला ऑर्ब ड्रेस घातला आहे. हिरव्या रंगाचा हा ड्रेस पूर्णपणे गोल भोपळ्यासारखा आहे. या ड्रेसमधून प्रियंकांचे हात देखील बाहेर येत नाहीत. त्या ड्रेसवरून लोकांनी तिला जबरदस्त ट्रोल केले असून तिच्यावरील बरेच मिम्स व्हायरल झाले आहेत.

प्रियांकाला देखील तिच्यावर केलेले हे मजेशीर मिम्स आवडले असून तिने तिच्या अकाऊंटवरून काही मिम्स शेअर केले आहेत. तिने तिच्यावर मिम्स करणाऱ्यांना थँकयू देखील म्हटले आहे.

मेट गालामध्ये प्रियांका चोप्राचं ‘अलबत्या गलबत्या’

मेट गाला 2019 या फॅशन इव्हेंटच्या रेड कार्पेट सोहळ्याला प्रियंकाने पती निक जोनससह हजेरी लावली होती. त्या मेट गाला सोहळ्याची थीम Camp: Notes on Fashion अशी ठेवण्यात आली होती. या सोहळ्यासाठी आलेल्या प्रियांकाने चंदेरी रंगाचा गाऊन घातला होता. तर मेकअप चेटकिणीसारखा केलेला. नेटकऱ्यांनी तिच्या लुकची खिल्ली उडवायला सुरुवात केली होती. प्रियांकाला Pati Dubroff या मेकअप आर्टिस्टने हा भन्नाट मेकअप केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या