प्रियंका गांधींनी गंगेचे पाणी प्यायले इतकी गंगा स्वच्छ झाली: नितीन गडकरी

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आतापर्यंत गंगा 30 टक्के शुद्ध झाली आहे, इतकी की काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही गंगेचे पाणी प्राशन केले असे नितीन गडकरी यांनी म्हटले. मध्य प्रदेशमध्ये एका सभेत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, गेल्या वेळी कुंभ दरम्न्या मॉरिशसचे पंतप्रधान हिंदुस्थान भेटीवर आले होते. त्यांनी गंगेत उतरण्यास नकार दिला. परंतु आता 30 टक्के गंगा स्वच्छ झाली आहे. जर असे झाले नाही तर प्रियंका गांधी यांनी गंगेचे पाणी कसे काय प्राशन केले असते? त्या जेव्हा इथे आल्या तेव्हा त्यांनी गंगेचे पाणी प्यायले. आम्ही तर त्यांना इतक्या सुविधा दिल्या आहेत की आता त्या प्रयागराजहून वाराणसीला जलमार्गाने जाऊ शकतात.

तसेच आमच्या सरकारने रस्त्यांसाठी 12 हजार कोटी खर्च केल्याचे गडकरींनी सांगितले या रस्त्यांमुळे भाविकांना गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ आणि केदारनाथला दर्शनासाठी जाऊ शकतात. तसेच कुठल्याही ऋतुमध्ये हे रस्ते चांगले राहतील अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.

 

आपली प्रतिक्रिया द्या