लोकशाहीत आवाज उठवणे हा गुन्हा आहे का?

119

लोकशाहीत आवाज उठवणे हा गुन्हा आहे का, असा सवाल काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा यांनी बुधवारी येथे केला. समाजवादी पक्षाचे बाहुल्य असलेल्या आझमगढला आल्या होत्या. सीएए आणि एनआरसीच्या विरोधामुळे अटक करण्यात आलेल्या मुस्लिम आंदोलकांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. सीएएला विरोध करताना हुसकावून लावलेल्या मुस्लिम महिलांनाही प्रियंका गांधी जाऊन प्रत्यक्ष भेटल्या. आझमगढ येथील बिलरियागंज भागात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात काही मुस्लिम महिलांनी 5 फेब्रुवारीला शाहीनबागच्या धर्तीवर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी या महिलांना तेथून हुसकावून लावताना लाठीचार्ज केला होता. तसेच 19जणांवर याप्रकरणी देशद्रोहाची वेगवेगळी कलमे लावून त्यांना तुरुंगात टाकले होते.

आपली प्रतिक्रिया द्या