‘आमचे सरकार येताच नवीन कृषी कायदे रद्द केले जातील’ – प्रियंका गांधी

कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून राजकारण दिवसेंदिवस आणखीन तापताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेस पक्ष विविध जिल्ह्यात महापंचायतींचे आयोजन करीत आहे. मंगळवारी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मथुराच्या पालीखेडा येथे शेतकरी महापंचायतीला संबोधित केले. यावेळी बोलताना प्रियंका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्यांना अहंकारी आणि भ्याड म्हटले आहे.

प्रियंका गांधी यावेळी बोलताना म्हणाल्या की, ‘जर पूर्वीच्या सरकारांनी काही बनवलेच नाही, तर तुम्ही विकत काय आहात? सरकारने फक्त नोटबंदी आणि जीएसटी बनवले आहे. ज्यामुळे जनता त्रस्त आहे.’

प्रियंका गांधी यांनी घोषणा केली आहे की, ‘जोपर्यंत तिन्ही कृषी कायदे रद्द होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहणार आहे. आमचे सरकार येताच हे कायदे रद्द केले जातील.’

प्रियंका पुढे म्हणाल्या, पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांशी काय वैर आहे, पंतप्रधान मोदींनी संसदेतही शेतकऱ्यांचा अपमान केला. यांचे मंत्री शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतात, असं त्या म्हणाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या