साडी ट्विटरची क्रेझ, प्रियंका गांधींनी शेअर केला फोटो

53

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर #SareeTwitter हा नवा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये महिला त्यांच्या साडीतील फोटो मोठय़ा प्रमाणात शेअर करीत आहेत. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही हा ट्रेंड फॉलो केला आहे. त्यांनी साडीतील एक फोटो ट्विट केला. हा फोटो त्यांच्या लग्नाच्या वेळेचा आहे. ‘22 वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या दिवशी सकाळच्या पूजेचा फोटो’ अशी कॅप्शन त्यांनी दिली. त्यानंतर प्रियंका यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे अनेक ट्विट येऊ लागले. त्यावर प्रियंका यांनी पुन्हा ट्विट केलं की, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, पण आमच्या लग्नाचा वाढदिवस फेब्रुवारी महिन्यात असतो. हा फोटो मी #SareeTwitter साठी पोस्ट केला आहे. #SareeTwitter या ट्रेंडमध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्दशी, अभिनेत्री नगमा, भाजपच्या नुपूर शर्मा यांनीही साडीतील फोटो अपलोड केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या