लोकशाही अस्तित्वात आहे का? प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारला सवाल

283
priyanka-gandhi

जम्मू कश्मीरातील 370 कलम हटवल्यानंतर राज्याच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांना सुमारे सहा महिने नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मग देशात लोकशाही अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडणे चुकीचा आहे का, असा सवाल काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला केला आहे.

गेल्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू कश्मीरला विशेष अधिकार देणारे 370 कलम केंद्राने रद्द केले. त्यानंतर सुमारे सहा महिने जम्मू-कश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना केंद्र सरकारने नजरकैदेत ठेवले आहे. हे मुख्य राजकीय धारेतील नेते जर कैदेत असतील तर देशात लोकशाही आहे असे कसे म्हणता येईल, असे प्रियंका म्हणाल्या.सत्ताधारी मोदी सरकारने कश्मीरला राजकीय तुरुंगाचेच रूप दिल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला

आपली प्रतिक्रिया द्या