वाराणसीमध्ये रोड शो दरम्यान प्रियंका गांधींच्या डोक्याला दुखापत

26

सामना ऑनलाईन । वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघामध्ये रोड शोदरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. रोड शो दरम्यान ट्रकचा रॉड लागल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली. जखमेवर तत्काळ उपचार घेऊन प्रियंका यांनी रोड शो सुरू ठेवला. ‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 13 जागांसह देशातील 59 जागांवर मतदान होणार आहे. 19 मे रोजी मतदान होणार असून 23 मे रोजी मतमोजणी होईल. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे उत्तर प्रदेशमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

बुधवारी दिल्लीवरून प्रियंका यांचे वाराणसीमध्ये आगमन झाले. यांतर त्यांनी सलेमपूर येथे काँग्रेस उमेदवारासाठी सभा घेतली आणि तेथूनच्या त्या रोड शोमध्ये सहभागी झाल्या. रोड शोच्या सुरुवातीला प्रियंका यांनी काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या गेट समोर पंडित मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्याला हार घातला. यानंतर रोड शो सुरू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या