प्रियंका रेड्डी बलात्कार व हत्या प्रकरणात आरोपींची क्रूरता, संतापजनक कृती उघड

6477

हैदराबाद येथील प्रियंका रेड्डी सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला असून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. आता पोलीस अहवालातून बलात्काराच्या घटनेने क्रूरतेचा कळस गाठल्याचे उघड झाले आहे.

‘त्या’ रात्री नक्की काय घडलं? प्रियंका रेड्डी बलात्कार व हत्या प्रकरणाचा संतापजनक अहवाल उघड

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींनी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रियंका रेड्डी हिला मदतीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. नंतर राष्ट्रीय महामार्ग 44 वरील चट्टनपल्ली गावात एका पूलाखाली आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवून दिला. मृतदेह पेटवून दिल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले, मात्र काही काळाने पुन्हा येऊन मृतदेह पूर्ण जळाला आहे अथवा नाही हे पाहण्यासाठी ते परत आले होते. पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे.

प्रियांका रेड्डी हत्या प्रकरण- 48 तासात पोलिसांनी कसा लावला छडा? वाचा घटनाक्रम

बलात्कारानंतर हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट
आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चट्टनपल्ली गावातील पूलाखालची जागा निवडली. पण त्याआधी शिवा आणि नवीन या दोन आरोपींनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर शामशाबाद आणि शादनगर दरम्यान वेगवेगळया जागांची पाहणी केली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागेचा शोध सुरु असताना दोन आरोपी पुढे मृत महिलेची स्कूटर चालवत होते तर अन्य दोघे ट्रकमध्ये होते. महिलेचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये होता. स्कूटरवर असलेल्या दोघांनी दोन ते तीन जागांची पाहणी केली. पण तिथे वर्दळ असल्याने अखेर त्यांनी चट्टनपल्ली गावातील पूलाखालची जागा निवडली अशी माहिती या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे.

ठेचून मारा! संसदेत संताप
हैदराबाद येथे बलात्कार करून महिला पशुवैद्य डॉक्टरला पेटवून ठार मारल्याचे घटनेचे पडसाद संसदेतही उमटले. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारले पाहिजे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी हैदराबाद येथील घटनेवर संसदेत संताप व्यक्त केला. तसेच 31 डिसेंबरपूर्वी फाशीची शिक्षा द्यावी अशीही मागणी संसदेत करण्यात आली.

ठेचून काढा, 31 डिसेंबरपूर्वी फाशी द्या! प्रियंका रेड्डी प्रकरणाचे राज्यसभेत पडसाद

आपली प्रतिक्रिया द्या