इम्रान खान यांच्यासमोर पाकिस्तानविरोधी घोषणा

19

सामना प्रतिनिधी । वॉशिंग्टन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेतील इनडोअर स्टेडियममध्ये पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांसमोर भाषण करत असताना बलूची समर्थकांनी जोरदार हुल्लडबाजी करत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. हे विरोधक तरुण प्रेक्षक म्हणून याच स्टेडियममध्ये बसले होते. इम्रान यांचे भाषण सुरू होताच ते उठून उभे राहिले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. बलुचिस्तानला न्याय देण्याबाबत ते घोषणा देत होते.

बलूच समर्थक घोषणा देत असतानाही इम्रान यांनी भाषण चालू ठेकले. सुरक्षा रक्षकांनी विरोधकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बलुचिस्तानकरील अन्याय दूर करण्यासाठी कॉशिंग्टन डिसीमध्ये बलूच संघटनांनी मोबाईल बिलबोर्ड मोहीम सुरू करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली आहे. बलुचिस्तानातील मानकी हक्कांचे उल्लंघन त्वरित थांबवण्यात यावे यासाठी जागतिक बलूच संघटनेने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे गार्‍हाणे गायले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या