कल्याण स्थानकात महिलेचा लोकलखाली येऊन मृत्यू, अपघातामुळे वाहतूक विस्कळीत

फाईल फोटो

सामना ऑनलाईन, ठाणे

असंख्य कारणांमुळे रोज उशिराने धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या आजही उशिराने धावत होत्या. सकाळी सातच्या सुमारास एका महिलेचा कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वर येणाऱ्या लोकल खाली आल्याने मृत्यू झाला. या महिलेला ट्रेनखालून बाहेर काढण्याचे बराच वेळ प्रयत्न सुरू होते, बाहेर काढेपर्यंत या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सकाळच्या वेळेस कोलमडली होती. बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणारी फास्ट मार्गावरची ही लोकल स्थानकातच बराच वेळ खोळंबून राहिल्याने मागून येणारे पुणे-मुंबई इंद्रायणी एक्सप्रेसही खोळंबली होती. यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांना जास्त उशीर व्हायला नको म्हणून त्या गाड्या पुढे काढण्यात आल्या. त्यानंतर लोकल गाड्या काढण्यात आल्याने लोकल जरा जास्तच उशिराने धावत होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या