अन पंकजा मुंडेंनी परळीतून काँग्रेसचे केले पॅकअप

4491

पंकजा मुंडे यांनी परळीत आघाडीला चांगलंच भगदाड पडलं आहे. काँग्रेस मध्ये 40 वर्षे काम करणाऱ्या प्रा. टी. पी. मुंडे यांच्या प्रवेशाने केवळ शहरातीलच नाही तर तालुक्यासह मतदार संघातील काँग्रेसचे पॅकअप झाल्याचे दिसून येत आहे. मुंडे भाऊ – बहिणीत होत असलेल्या परळी विधानसभा लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. आज परळीतील काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा.टी.पी.मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.

प्रा. टी. पी. मुंडे यांनी आज अक्षता मंगल कार्यालयात आपल्या समर्थकांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी बोलतांना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंडे साहेबांच्या लेकीला त्रास दिला, राजकारणात पाय ओढण्याचे काम केले, ज्या मुंडे साहेबांनी तुम्हाला सर्व काही दिले त्याच्याशीच गद्दारी केली, पंकजाताई माझी लेक, चुलता म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. परळीत काँग्रेस पक्ष संपविण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पंकजा मुंडेंना विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला. नगर पालिका, बाजार समिती जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या टी.पी.मुंडे यांच्या प्रवेशामुळे परळीत राष्ट्रवादीलाही मोठा धक्का समजला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या