प्रोफेसरने महिलेसोबतचा सेक्स व्हिडीओ पॉर्न साईटवर केला शेअर

4406

आसाममधील दिब्रुगढ विश्वविद्यालयातील एका प्रोफेसरने स्वत:चाच सेक्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाकडून त्या प्रोफेसर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या प्रोफेसरचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती महिला डिब्रुगढ विद्यापीठाची विद्यार्थीनी असल्याची चर्चा झाली होती. मात्र ती महिला विद्यापीठाची विद्यार्थीनी नसल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदर प्रोफेसर तीन वर्षांपूर्वी एका महिलेला हॉटेलमध्ये भेटला होता व त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले होते. त्यावेळी त्यावेळी त्याने त्या खासगी क्षणांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. ते व्हिडीओ त्याने एका पॉर्न साईटवर टाकला होता. त्यानंतर आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या प्रकरणी विद्यापीठाची बदनामी होत असल्याने विद्यापीठाने प्रोफेसर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रोफेसरला अटक केली असून त्याचा लॅपटॉप जप्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या