झाकीर नाईकची १८ कोटींची मालमत्ता जप्त

20
zakir-naik

सामना ऑनलाईन, मुंबई

मुसलमान तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी उद्युक्त केल्याचा आरोप असलेला वादग्रस्त इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याची १८ कोटी ३७ लाखांची मालमत्ता आज अंमलबजावणी संचालयाने जप्त केली. २०० कोटींच्या ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणात त्याच्या विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने तब्बल २०० कोटींचे मनी लॉण्डरिंग केले. त्यातील ५० कोटी रुपये नाईक याची बहीण नईलाई नौशाद नुरानी हिच्या बँक खात्यात जमा करण्यात आले हे अंमलबजावणी संचालयाने तपासात सिद्ध केले आहे. नईलाई ही झाकीर नाईक याच्या पाच बोगस कंपन्यांची संचालक होती. त्या कंपन्यांचा ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’साठी केलेल्या मनी लॉण्डरिंगमध्ये सहभाग आहे. दरम्यान, डॉ. झाकीर नाईक याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने आज दुसऱयांदा समन्स बजावले. त्याला ३० मार्च रोजी ‘एनआयए’च्या दिल्ली येथील कार्यालयात हजर राहण्यासाठी कळवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या