अडीच महिन्यांनंतर चोरासह ८० लाखांचा मुद्देमाल सापडला

13
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई
मुलुंडमध्ये ८० लाख ५० हजारांची घरफोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळून ८० लाखांचे दागिने हस्तगत करण्यात प्रॉपर्टी सेलला यश आले आहे. राजेश शेट्टी (३५) असे आरोपीचे नाव असून त्याने भरदिवसा घरफोडी केल्याने मुलुंडच्या गुलशन को. ऑपरेटिव्ह सोसायटीत प्रचंड घबराट पसरली होती.

अडीच महिन्यांपूर्वी घर बंद करून जैन कुटुंब नातेवाईकांकडे गेले होते. दोन तासांनंतर ते घरी परतल्यावर चोरी झाल्याचे उघडकीस आले. घरातील ८० लाख ५० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, कॅमेरा असा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रॉपर्टी सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर तसेच एपीआय दीप बने, लक्ष्मीकांत साळुंखे, उपनिरीक्षक संजय पाटील तसेच दत्ता कुडले, दत्तात्रय कोळी, अनिल सोनावणे, महेश मोहिते, आत्माराम सोनवणे, राहुल जाधव, शैलेश उत्तेकर, किरण जगदाळे, राजकुमार चौहाण आदींचे पथक या गुह्याचा समांतर तपास करीत होते. अखेर ती घरफोडी राजेश शेट्टी याने केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी शिताफीने शोध घेऊन त्याला बेडय़ा ठोकल्या.

आपली प्रतिक्रिया द्या