भाजप मुर्दाबाद, मुख्यमंत्री मुर्दाबाद

devendra-fadnavis

सामना ऑनलाईन,नागपूर

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱया ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सर्वपक्षीय प्रजातंत्र बचाओ समितीने केला आहे. इतकेच नव्हे तर महानगरपालिकेची नुकतीच पार पडलेली निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे फेरनिवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धडक दिली तसेच जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. सर्वपक्षीय प्रजातंत्र बचाओ समितीतर्फे गुरुवारी सकाळी 11.30 वाजता चिटणवीस पार्क येथून मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते विशाल मुत्तेमवार, शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर,  माजी महापौर किशोर डोरले आदींनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी फेरमतदान घेण्यात यावे अशी मागणी केली. भाजप सरकारविरोधात घोषणा देत हा मोर्चा गोवारी टी पॉइंटजवळ आल्यानंतर संविधान चौकात अडविण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रचंड नारेबाजी करीत निदर्शने केली.

भाजपचे धाबे दणाणले; विरोधकांना नोटिसा

मतदार याद्यांतील घोळ आणि ईव्हीएम घोटाळय़ाविरोधात राज्यभरात मतदारांचा होऊ लागलेला उठाव आणि सर्वपक्षीय आंदोलनामुळे ‘एकाकी’ पडलेल्या भाजपचे धाबे दणाणले आहे. ईव्हीएम घोटाळय़ाविरोधात आवाज उठवणाऱया विरोधकांना भाजपने नोटिसा बजावण्याचे काम हाती घेतले आहे.

भाजपच्या विधी कक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद तिवारी यांनी यवतमाळ जिह्यातील एक नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी बोलेनवार यांच्यातर्फे अनेक नेत्यांना नोटिसा धाडल्या आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे यांच्यापासून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधींचाही समावेश आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या