स्टेट बँक ऑफ टोमॅटो

45

सामना ऑनलाईन । लखनऊ

शंभरी गाठलेल्या टोमॅटोने सर्वसामान्यांची पुरती पंचाईत केली असून टोमॅटोचा भाव खाली येण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीचा निषेध करण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात लखनऊ काँग्रेसने शहरात स्टेट बँक ऑफ टोमॅटो सुरू केली असून या बँकेत टोमॅटोची गुंतवणूक करणाऱया ग्राहकांना सहा महिन्यांनी पाचपट टोमॅटो मिळणार आहे.
सर्वसामान्य बँकेत मिळणाऱया सुविधा या बँकेत उपलब्ध आहेत. टोमॅटोवर ८० टक्के कर्ज, टोमॅटो डिपॉझिट करणे, लॉकर सुविधा या स्टेट बँकेत ग्राहकांना मिळणार आहेत. शेतकऱयांच्या मालाला संरक्षण देण्यासाठी तसेच सर्वसामान्य गृहिणींना मदत करण्यासाठी लखनऊ काँग्रेसने ही टोमॅटो बँक सुरू केली असून या बँकेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या